टॉप बातम्या

महागांव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युवा कार्यकारीणी गठीत


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२० सप्टें.) : तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकारणीचे नियुक्तीपत्र शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून देण्यात आले.

यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना अध्यक्षीय प्रतिपादनामध्ये मनीष भाऊ जाधव यांनी शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर कुठल्याही पक्षीय झेंडे खांद्यावर न घेता शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी व त्यांच्या न्याय व हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने मध्ये चळवळीत संघटित व्हावे असं कळकळीचे आवाहन केले. शासकीय विश्राम गृह महागाव येथे तालुक्याची युवा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

प्रमोद अडकिने (महागाव तालुका अध्यक्ष युवा), दिपक हाडोळे (तालुका उपाध्यक्ष युवा), सचिन उबाळे ( तालुका सचिव युवा), सचिन शेळके (ता. कोषाध्यक्ष युवा ), राजु पवार (ता. उपकोषाध्यक्ष युवा), अमोल राठोड (ता.सहसचिव युवा), रामचंद्र चव्हाण (ता.कार्याध्यक्ष युवा), रामू मोरे (फुलसावंगी सर्कल प्रमुख), रमेश राठोड (ता. प्रसिद्धीप्रमुख युवा), विजय पवार (ता.सल्लागार युवा) सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी तालुक्यातील शेतकरी प्रल्हाद राठोड, विठ्ठल कव्हाणे, अर्जुन जाधव, मनीष जाधव (जिल्हाध्यक्ष), शिवानंद राठोड (युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना) व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post