सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२० सप्टें.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला असतांना वणी शहर व तालुक्यातही कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वणी तालुका कोरोनाचा हॉसस्पॉट ठरला. रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. कित्येकांना बेड उपलब्ध न झाल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाही. उपचाराअभावी व उपचारादरम्यान कित्येकांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाबळींची संख्या दुसऱ्या लाटेत प्रचंड वाढली. या कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना या आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना छोटीशी आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोरोनाने मृत्यू झालेल्या २५ व्यक्तींच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना हे धनादेश देण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः कोरोनाबळींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करित त्यांना ही आर्थिक मदत दिली. यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प.स. सभापती संजय पिंपळशेंडे, भाजपाचे विजय पिदूरकर, भाजपा शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, शहर सरचिटणीस राकेश बुग्गेवार, अनुसूचित जमाती शहराध्यक्ष दिगांबर चांदेकर, मनोज सरमुकद्दम, ऍड. प्रवीण पाटक तथा युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाबळींच्या कुटुंबियांना देण्यात आली आर्थिक मदत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2021
Rating:
