सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२० सप्टें.) : स्थानिय महापालिका निवडणूक जवळ येत असतांनाच LIC मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अधिवक्ता म्हणून कार्यरत असलेले गणेश रासपायले यांनी नुकताच आपचे संस्थापक सदस्य युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे व कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांच्या प्रमुख उपस्थित आम आदमी पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे लोकांना त्यात स्वारस्य राहिले नाही, अशावेळी आपणांस आम आदमी पक्षातच आशेचा किरण दिसला असे मत प्रवेश केल्या नंतर रासपायले यांनी व्यक्त केले.स्थानिक मनपात आता भाजपाचे अस्तित्व संपल्यातच जमा झाले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
साईबाबा वार्ड येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळ्यात आपचे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी त्यांना रितसर प्रवेश दिला.
गणेश रासपायले यांचा "आप" मध्ये प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2021
Rating:
