नामवंत सहजं सुचलं कलाकुंज व्यासपीठाच्या ॲड. कविता माेहरकर यांची स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२२ सप्टें.) : कला, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रा साेबतच सामाजिक कार्यात माेलाचं योगदान देणाऱ्या विदर्भातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिराेली जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असणाऱ्या ॲड. कविता माेहरकर यांची स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे. सदरहु राष्ट्रीय पुरस्कार त्यांना अखिल भारतीय पत्रकार संघच्या वतीने येत्या शनिवार दि.२५ सप्टेंबरला मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थित बहाल करण्यात येणार आहे.
दरम्यान उपराेक्त पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे, याेगगुरु शिक्षिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे, सिमा भसारकर पाटील सहजं सुचलं व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सराेज हिवरे, उज्वला यामावार, सारीका खाेब्रागडे, श्रुती कांबळे, कु.सायली टाेपकर, पुनम रामटेके, कविता चाफले, मंथना नन्नावरे, रसिका ढाेणे, संजिवनी धांडे, छबुताई वैरागडे, श्रुती उरानकर, नयना झाडे, स्मिता बांडगे, विजया भांगे, मनिषा मडावी, सविता भाेयर, विजया तत्वादी, प्रतीक्षा मैदपवार, श्रुष्टी राेकडे, कांचन मुन, मेघा भांडारकर, पुनम काेसरे, प्रतीक्षा झाडे, श्रध्दा हिवरे, दर्शना चाफले आदींनी माेहरकर यांचे अभिनंदन केले.
ॲड. कविता माेहरकर या सहजं सुचलं कलाकुंज व्यासपीठाच्या एक जेष्ठ सदस्या आहे. या स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांनी स्वताच्या नावां साेबतच सहजं सुचलंचे नाव लौकिक केले आहे.
नामवंत सहजं सुचलं कलाकुंज व्यासपीठाच्या ॲड. कविता माेहरकर यांची स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
