चंद्रपूरात एक दिवशीय धरणा आंदोलन; अनेकांची उपस्थिती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२१ सप्टें.) : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्रोफ़ेसर्स, टीचर्स एंड नॉन टीचिंग एम्प्लाँइज विंग (प्रोटान) संघटनेच्या वतीने दि.२१ सप्टेंबर २०२१ ला महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात (एकाच दिवशी )सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षण सेवक, विषयतंज्ञ, CHB तत्वावरील प्राध्यापक यांच्या विविध समस्यावर धरणा आंदाेलन आयोजित करण्यांत आले हाेते, त्याचअनुषंगाने चंद्रपुर शहरात आज मंगळवारी एकदिवशीय जिल्हास्तरीय धरणा प्रदर्शन आंदोलन आयोजित केलेे होते. त्यानंतर दुपारी ४ वाजता चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना प्रोटान कार्यकारणी कडून एक निवेदन सादर करण्यांत आले.
      
शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी, त्यांच्या संविधानिक हक्क अधिकारासाठी लढणारे प्रोटान हे प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एकमेव बहुजन कर्मचारी संघटन आहे. शासन, प्रशासन आणि न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न ही संघटना यशस्वीपणे सोडवित आहे.
      
सरकार एकीकडे कायदा दुरुस्ती करून सुध्दा अनेक कायदेशीर तरतुदी राखून ठेवते आणि दुसरीकडे त्यांच्या अंमलबजावणीसाठी दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करीत एकीकडे कायद्याने बंधनकारक अटींवर शैक्षणिक व प्रशासकीय स्तरांवर सरकारचे दुर्लक्ष होऊन अन्यायकारक वागणूक मिळत आहे, तर अनिर्देशित न्यायप्रविष्टतेच्या नावाखाली टाळाटाळ करीत आहेत.
      (बहुजन कर्मचारी संघटना निवेदन देताना)

न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून निर्णय घेणे शक्य असतानाही सरकार अनेक प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायापासून वंचित ठेवत आहे. कांही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न्यायनिवाडा झाला तरी समय सीमा अनुल्लेखामुळे अन्याय दूर केला जात नाही.
म्हणूनच जे सार्वजनिक प्रश्न संघटनेने हाक देऊनही उपरोक्त कारणांनी सरकारला अद्यापही सोडविता आले नाहीत, त्याचा निषेध व्यक्त करून सरकारला जागे करण्यासाठी प्रोटान दि. २१ सप्टेंबर आणि २१ ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात राज्यव्यापी आंदोलने करणार आहे. प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन नियुक्ती, पदोन्नती, वेतन आयोग, वरिष्ठ व निवडश्रेणी कायम मान्यता, पूर्णवेळ मान्यता, समान वेतन, किमान वेतन, CAS प्रक्रिया, अतिरिक्त समायोजन, शाळा महाविद्यालय बंद करण्याचे धोरण या अनुषंगाने होणारी अडवणूक आणि पिळवणूक या विषयी संघटनेकडून नित्य संघर्ष सुरू आहे. भविष्यात तो आणखी गतिमान, तीव्र आणि उग्र स्वरूपात करण्यात येणार आहे.

सदरहु आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्रोटान चे मनोहर बांदरे,डॉ. ज्योत्स्ना भागवत, प्रा .सूचिता खोब्रागडे, प्रा .कविता चंदनखेड़े, रचना गेडाम,कवडूजी पडवेकर ,आंनदा गावंडे, अभिषेक भसारकर, बुटले,कल्पना पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रपूरात एक दिवशीय धरणा आंदोलन; अनेकांची उपस्थिती चंद्रपूरात एक दिवशीय धरणा आंदोलन; अनेकांची उपस्थिती Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.