सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०८ सप्टें.) : शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित 'पुरोगामी साहित्य संसद' च्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी कवी,साहित्यिक,वक्त्या ॲड.योगिता रायपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी केली आहे.
पुरोगामी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी, अंधश्रद्धेचे समूळ नष्ट करण्यासाठी पुरोगामी कवी, साहित्यिकांच्या हक्काची संसद निर्माण व्हावी यासाठी पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्रात काम करणार आहे. ॲड.योगिता रायपुरे या गेली अनेक वर्षांपासून सामाजिक,सांस्कृतिक,साहित्यिक आंदोलनात सक्रिय भूमिका बजावून आपल्या लेखणीने अनिष्ट रूढी, समाजविघातक परंपरा, अंधश्रद्धा यावर प्रखर हल्ला चढविला आहे. परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांना पेरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
योगिता रायपुरे यांच्या नियुक्ती बद्दल साहित्य,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कवी-साहित्यिकांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. ही निवड झाल्याबद्दल योगिता रायपुरे यांनी संसदेचे प्रमुख मार्गदर्शक विजय सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांचे आभार व्यक्त केले आहे. त्यांचे नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.
पुरोगामी साहित्य संसदेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी ॲड.योगिता रायपुरे यांची नियुक्ती !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 08, 2021
Rating:
