सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०८ सप्टें.) : कोंबडीला का मारले म्हणून वाद घालत लाकडी दांड्याने डोक्यावर व हातावर मारून जखमी केल्याची घटना बैल पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता राजूर (कॉ.) येथे घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजूर कॉलरी येथे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली असून मागील काही दिवसांत मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. वादविवाद व मारहानीच्या काही घटनांमध्ये तर तिक्ष्ण हत्यारांनी सुद्धा हल्ला चढविल्याचे पाहायला मिळाले. भाईगिरीच्या विळख्यातून हळू हळू मुक्त होत असलेलं राजूर कॉलरी हे गाव मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे परत एकदा नावारूपास येऊ लागलं आहे. शुल्लक कारणांवरून हल्ला चढविण्याच्या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. बैल पोळ्याच्या दिवशी दोघा जणांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. दुर्योधन आत्राम (५६) रा. राजूर कॉलरी याने कोंबडीला का मारले म्हणून गावातीलच ज्ञानेश्वर नामदेव काळे (६९) याच्याशी वाद घालत त्याला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. ज्ञानेश्वर काळे याच्या डोक्यावर व हातावर लाकडी दांड्याचे वार बसल्याने ते चांगलेच जखमी झाले. त्यानंतर दुर्योधन आत्राम यांच्या कुटुंबातील महिलांनीही शिवीगाळ करित मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर काळे यांनी झालेल्या मारहाणीची व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून दुर्योधन आत्राम (५६), प्रेमीला दुर्योधन आत्राम (५२) व वैशाली (पूर्ण नाव माहिती नाही) वय अंदाजे २७ वर्षे सर्व रा. राजूर कॉलरी या तीनही आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास जमादार कांबळे करित आहे.
कोंबडीला का मारले म्हणून लाकडी दांड्याने केली मारहाण, राजूर कॉलरी येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 08, 2021
Rating:
