सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१९ सप्टें.) : विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा व यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात अनेक दुचाकी वाहने चाेरणारा एक कुख्यात चाेरटा नुकताच पाेलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
अलिकडे शहरात दुचाकी वाहनांच्या घटना वाढत असतांनाच चंद्रपूर एलसीबीच्या एका पथकाने माेठ्या शिताफीने वराेरा तालुका अंतर्गत येत असलेल्या अर्जुनी चारगांव येथील राजू उर्फ राजकुमार धुर्वे यांस अटक केली आहे. पाेलिस चाैकशीत त्याने ९ दुचाकी वाहने चाेरल्याची कबुली दिली असल्याचे समजते.
दरम्यान, पाेलिसांनी त्याचे कडील सर्व वाहने हस्तगत केली आहे. सदरहु कारवाई एलसीबीचे बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूरच्या पाेलिस पथकांनी केली.
चंद्रपूरात कुख्यात दुचाकी चाेरटा पाेलिसांच्या ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2021
Rating:
