टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मृत पावलेल्यांना धनादेश वाटप


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ सप्टें.) : तालुक्यातील टाकळी (ई) येथील गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आदिलाबाद येथे काम करण्यासाठी पिंपळवाडी येथील मजूर काम करण्यासाठी गेले होते.
शेतामध्ये काम करीत असतांना संगीता संजय जाधव (वय २८) यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता व दुसऱ्या घटनेत पिंपळवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी प्रकाश सिताराम चव्हाण यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. 
या दोन्ही घटनेमधील परिवारांना बळीराजा चेतना अभियानांतर्गत मृत्यू पावलेल्याना धनादेशाचे दि १८/९/ २०२१ रोज शनीवार ला वाटप करण्यात आले.

आदिलाबाद येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या संगिता संजय जाधव व प्रकाश सिताराम चव्हाण ह्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियान अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच उज्ज्वला हाके, उपसरपंच दिलीप जाधव, सचिव विनोद चव्हाण, सदस्य संदेश मोरे, विठ्ठल गव्हाळे, उमेश जाधव, बाळू चव्हाण,अतुल देवकते, मोहन जाधव, भारत जाधव प्रमोद जाधव, प्रदीप राठोड (इंजिनीयर) सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, ह.भ.प. दत्ता महाराज, विनोद चव्हाण व नागरिक उपस्थित होते.
टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मृत पावलेल्यांना धनादेश वाटप टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मृत पावलेल्यांना धनादेश वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.