भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : दिनांक २५ व २६ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाची, वर्ग 'क' आणि 'ड' ची होणारी परीक्षा परीक्षेच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व आर्थिक फटका बसला आहे. या विरोधात आज केळापूर पांढरकवडा भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी करण्यात आली आणि तसे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

या वेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले, भाजपा शहराध्यक्ष दिलीप मुथा, भाजपा किसान आ.तालुकाध्यक्ष यशवंत काळे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा तालुकाध्यक्ष धीरज शर्मा, भाजपा महिला तालुकाध्यक्ष अश्विनी नरडवार, भाजपा महिला शहराध्यक्ष सौ.शीतल बाजोरिया, भाजपा नगरसेवक बंटी जुवारे, भाजपा नगरसेवक सौ.रिता कनोजे, किसन रोडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज त्रिशूलवार, तरुण सिंघानिया, किशोर मलीये, अनिल बुद्धपवार, उमाशंकर कनोजे, संदीप बाजोरिया, उ.भा मोर्चा वीरू बैस, युवा मोर्चा चे विशाल दुबे, शुभम जुमडे, शुभम घोडमारे, प्रमोद राऊत, शुभम जुनघरे, अतुल चितलवार, आकाश गहरवाल, प्रवीण मंडाले, राकेश मिरलवार, रोहित खडीकर, समीर गेडाम, अंकित घोडाम, वैष्णव सिडाम, सर्वेश हींकरे सह अनेक भाजपा पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.