बराड राष्ट्रीय महामार्गावर महावितरणच्या विरोधात शेतकऱ्याचे रस्ता रोको आंदोलन

सह्याद्री न्यूज | अमोल टेकले 
मुदखेड, (२७ सप्टें.) : बारड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक१६१ वर शेतकऱ्यांनी महावितरण वीज कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता शेतीची वीज कट केली असल्याने या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी बाळासाहेब देशमख यांचा नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले आहे.

मागील काही दिवसापासून शेतकरी नैसर्गिक संकटाने हैराण झाला आहे पावसाच्या पाण्याने हाताला आलेले सोयाबीन सह ऊस केळी हळद या पिकांना मोठा फटाका बसला आहे तर नदी नाल्या शेजारील पिके वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही हलक्याची बनली आहे शेतकरी संकटात सापडला असून दुष्काळाच्या सावटाखाली वावरत असताना महावितरण कंपनीने सक्तीने वीज बिल वसुली मोहीम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडून वीज बिल वसुली करणे म्हणजे शेतकऱ्यावर सक्ती करणे हा प्रकार होत असून शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याने गावात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. महावितरण कार्यालयाच्या सक्तीच्या वसुली मोहिमेवर तसेच ना कुटलीही सुचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उध्दट वागणूक देण्यात येत आहे. अशा या प्रकाराने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात एल्लगार पुकारला असून रास्तारोको आंदोलन केले आहे. या पुढे महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय शेतीविषयक विजे बाबत शेतकऱ्याचा मागण्या समस्या पूर्ण कराव्यात व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी हा प्रकार थांबला नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनावर देण्यात आला आहे.

 या वेळी शेतकऱ्याचा मागण्याचे निवेदन उप कार्यकारी अभियंता पंकज देशमुख कनिष्ठ अभियंता आर.व्ही. धकाते यांचा कडे देण्यात आले आहे. या वेळी निवेदनावर बाळासाहेब देशमुख बारडकर, माणिक लोमटे, दिगंबर टीप्परसे, विलास देशमुख, शरद कवळे, गजानन कत्रे, किरण महाजन, किशन देशमुख, कैलास फुलकुंटवार,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी युवा शेतकऱ्याने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या वेळी पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्याने चोक बंदोबस्त ठेवला होता.यावेळी महामार्गावर एक तास वाहतूक खोळंबली होती.
बराड राष्ट्रीय महामार्गावर महावितरणच्या विरोधात शेतकऱ्याचे रस्ता रोको आंदोलन बराड राष्ट्रीय महामार्गावर महावितरणच्या विरोधात शेतकऱ्याचे रस्ता रोको आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.