सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (२७ सप्टें.) : जि प.उच्य प्राथमिक शाळा मारेगाव (को) येथील धेय्यवेढ्या शिक्षकांनी कोरोनाकाळातही लोक वर्गणीतुन संगणक कक्ष स्थापन केले. अविरत धडपड, बालकांच्या शैक्षणिक हिताची निरतंर तळमळ आणि एकदंरच सकारात्मक शिक्षणासाठी एक श्वासत विकासाच्या गुणवत्तेची हमी म्हणजे जि.प. उच्च प्राथमिक शाळा मारेगाव (को) येथील शाळेची घोडदौड चालु आहे.
गुणवत्तेसाठी पालकांचा पुढाकारआपली मुलं शिकली पाहिजे गुणवत्तेत टिकलीही पाहिजे यासाठी प्रशासनाकडुन मिळत असलेली मदत ही तोकडी आहे.आपणच आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी शाळा सुसज्ज करावे. वाबडेवाडी चे पालक देशात आदर्श घडवु शकतात मग मारेगावचे पालक वर्ग मागे राहणार नाही आपल्याच लेकरासाठी आपणच पुढाकार घ्यावा असे आवाहन पालक मेळाव्यात मुख्याध्यापक अरविंद गांगुलवार व सर्व शिक्षक वृंदानी केल्यामुळे मारेगाव गावातील पालक तनमन धनानी शाळेला मदत केले.
शाळेचे गेल्या तीन वर्षात कायापालट झाले असुन प्रत्येक वर्गात टीव्ही संच, फंखे, भरपुर उजेडासाठी विद्युत लाईट, पिण्यासाठी आ रो चे शुद्ध पाणी, उत्कृष्ट स्पिकर संच, शालेय आवारात सि सी टी वी कॅमैरे, व्हर्चुअल क्लासरुम, कोरोना काळातही पालकाकडुन लोकवर्गणी, ग्रामपंचायत, व चांदा शिक्षण संस्था द्वारा संचालित जनता हायस्कुल सर्व शिक्षक वृंदा कडुन लोकवर्गणीतुन पाच संगणक प्राप्त झाले वर्ग खोलीचे कल्पकतेने रंगरंगोटीकरुन सुसज्ज असे कक्ष निर्माण केले.
या संगणक कक्षाचे आज दि. १८ सप्टेबर २१ ला श्री राजेंद्र ठाकरे सरपंच (मारेगाव) यांचे शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री देरकर सरश्री प्रकाश नागतुरे (गशिअ), श्री नवनाथ देवतळे (वि अ), श्री मसराम (तलाठी) श्री मोहन कुचनकार ( अध्यक्ष शा व्य स) श्री लक्ष्मण वेद्य (गुरुदेव सेवा मंडळ) समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दानशुर पालक उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री नागोरावजी ढेंगळे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे. नियमित वेबिनार आयोजित करुन विद्यार्थ्यांना प्रवाहात ठेवण्याचे कार्य हे माझ्या शिक्षकांनी केले आहे, तेवढेच पालकांची जबाबदारी महत्वाची आहे. मारेगाव कोरंबी येथील सुज्ञ पालकांनी समाजासमोर खुप मोठे आदर्श निर्माण केले आहे. गेल्या तीन वर्षात सर्व पालकांच्या सहकार्याने शाळेचा चेहरा मोहरा बदलवुन विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याचे कार्य होत आहे. आता संगणकाचे शिक्षण देवुन आंतरराष्टीय दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्याना देणे मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विचार श्री अरविंद गांगुलवार यांनी व्यक्त केले. अनेक मान्यवरांचे प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
मारेगाव (को) ही शाळा प.स,वणी मधील एक आदर्श व गुणवत्तापुर्ण शाळा आहे येथील पालक वर्गानी समाजाला आदर्श दिशा देण्याचे बहुमोल कार्य केले आहे असे मत श्री प्रकाश नागतुरे यांनी व्यक्त केले. गावची शाळा ही सुज्ञ समाजाचा आरसा आहे. दर्जेदार शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे शिक्षण जर जि.प. शाळेत मिळत आहे. हे बहुजन समाजाचे भाग्य आहे असे, मत श्री मसराम तलाठी यांनी व्यक्त केले. शिक्षण सर्वच ठिकाणी मिळते पण दर्जेदार व आंतरराष्टीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मारेगाव शाळेतील सर्व शिक्षक तत्पर असुन वणी तालुक्यात उत्कृष्ट शाळाम्हणुन नावलौकिक प्राप्त झालेली शाळा आहे यात पालकांचे योगदान हे महत्वाचे आहे असे मत श्री नवनाथ देवतळे (वि अ) यांनी व्यक्त केले. प्रसंगी श्री देरकर सर व श्री पाचभाई सरांनी इंग्रजीतुन संबोधन करुन शाळा उत्तमोत्तम प्रगतीकडे वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास उपस्थिताच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सोशल डिस्टटींग ठेवुनच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन कु.माधवी पोटकर, यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री विजय शेळके यांनी केले कार्यक्रमासाठी कु.प्रिया राउत श्री उत्तमराव कोवे यांनी सहकार्य केले.
मारेगाव (को) येथे लोक वर्गणीतुन कोरोना काळात शाळेत संगणक कक्षाची स्थापना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
