सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२७ सप्टें.) : केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.महामहीम राष्ट्रपती यांनी २७ सप्टेंबर २०२० ला सही करून कायद्यात रूपांतर केले. या घटनेला आज २७ सप्टेंबर २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आणि मागील अकरा महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहे त्याची दखल घेण्यासाठी म्हणून आजच्या भारत बंद चे आयोजन करण्यात आले. त्या अनुशंगाने पांढरकवडा येथे शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. तसेच. श्रीनिवास नालमवार, बिशनसिंग शिंन्दो, तिरुपती कंदकुरिवार, जयवंत बंडेवार, संजय झोटिंग, नटवर शर्मा, सूभाष राठोड, प्रंशात बोंडे, मनोज भोयर, ईकाम अली, शुभम वरगंटवार, सूभाष दरणे, अतिष गांवडे, महेश फिरके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी तहसिल कार्यालय पांढरकवडा यांना निवेदन देण्यात आले.
भारत बंद: शेतकरी संघटना व सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने पांढरकवडा तहसील कार्यालयाला दिले निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
