सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (२७ सप्टें.) : तेरवीचा खर्च टाळून मोक्षधाम सेवा समितीला ३१हजार रुपयांची आर्थिक मदत करून दावलबाजे परिवारांने सामाजिक दायित्व जपत समाजासमोर नवा आदर्श केला आहे.
महागाव सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये मैलकुली पदावर कार्यरत असलेले शेषराव गणपत दावलबाजे रा. हिवरा (संगम) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.त्यांच्या तेरवी वर होणारा खर्च टाळून येथील मोक्षधाम सेवा समितीला अकरा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय त्यांच्या पत्नी,मुलगा व दोन मुलींनी घेतला.माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांच्या हस्ते ही रक्कम मोक्षधाम सेवा समितीला दान दिली.
यावेळी स्व.दावलबाजे यांच्या पत्नी श्रीमती आशाबाई दावलबाजे, मुलगा अमोल,मुली सौ सोनाली गणेश खोडके (कळसा), सौ शितल शालिग्राम महिंद्रे (बोरी), सुन सौ.सपना अमोल दावलबाजे, मोठे बंधु प्रल्हाद ग.दावलबाजे,छोटे बंधु सुभाष ग.दावलबाजे,पुतण्या रमेश दावलबाजे, जावाई गणेश खोडके, शालीग्राम महिंद्रे, माजी सरपंच डॉ. धोंडिराव बोरूळकर, प्रविण जामकर, हिवरा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान फाळके, मोक्षधाम सेवा समिती अध्यक्ष काशीराम हरणे, राजेंद्र कदम यांच्यासह मोक्षधाम सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य व गावकरी उपस्थित होते.
तेरवी चा खर्च टाळून मोक्षधाम सेवा समितीला आर्थिक मदत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
