राहते घर कोसळले, हिवरा (मजरा) येथील घटना

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२६ सप्टें.) : मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात कोसळधार पाऊस येत आहे. त्यामुळे दि. २५ सप्टेंबर रोज शनिवारी रात्रीच्या दरम्यान, हिवरा (मजरा) येथील मातीचे घर पाणी मुरल्याने घर कोसळले. सुर्दैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, यात त्या कुटुंबाचे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे समजते.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस चालूच आहे. अशातच शनिवारी सांयकाळच्या दरम्यान, हिवरा (मजरा) येथील शंकर सुर्यभान वाघमारे रा.हिवरा (मजरा) यांच्या मालकीचे असलेले मातीचे घर पावसाचे पाणी मुरून कोसळले. सुर्दैवाने जिवीतहानी टळली परंतु एक ते दिड लाख रुपयाचे नुकसान झाले असून, संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून उचित भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शंकर सुर्यभान वाघमारे यांनी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी होत असुन, शेतीला चांगलाच मार बसत आहे. संततधार पाऊसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतीचे येणारे उत्पन्न ही हिरावले जाण्याची शक्यता नाकारता येत नसून कापसाची बोन्ड सडणे, सोयाबीन ला कोंब फुटणे या अतिवृष्टीमुळे हातात आलेले पिक खराब होण्याचे मार्गांवर असल्याचे चित्र आहे.
राहते घर कोसळले, हिवरा (मजरा) येथील घटना राहते घर कोसळले, हिवरा (मजरा) येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.