गजानन महाराज सेवा समिती द्वारा संगीत शिक्षक अजित खंदारे सर यांचा सत्कार


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२७ सप्टें.) : श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र चे संचालक श्री अजित खंदारे सर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गजानन महाराज सेवा समिती वणी द्वारा सत्कार.करण्यात.आला..
श्री अजित सर हे संगीत क्षेत्रात मुलांना घडावण्याचे उत्तम कार्य करतात. वेगवेगळ्या उपक्रमा द्वारे मुलाना संधी देतात. येत्या काही दिवसात यवतमाळ आकाश वाणी ला श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लास च्या मुलाचा प्रोग्राम होऊ घातला आहे.

संगीत शिक्षक सोबत त्यांच संगीतकार म्हणून पण नाव आहे. वणीचे कुलदैवत असणारे श्री रंगनाथ स्वामी यांची आरती प्रथनम च लिहून स्वरबध्द करण्याचे मोलचे कार्य त्यांनी केले आहे. शेगाव संस्थान येथील श्री गजानन महाराज याचे अभंग त्यांनी स्वरबध्द केले आहे. त्यानी स्वरबध्द केलेले बरेच अभंग रिलिज पण झाले आहेत आगामी एका मराठी चित्रपटाला संगीत ते देणार आहे. सदर कार्याची दाखल घेत त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री गजानन महाराज सेवा समिती चे अध्यक्ष श्री विनयजी कोंडावार, ह.भ.प मनू महाराज तुगनायत. व सेवा समिती चे सदस्य उपस्थित होते.
गजानन महाराज सेवा समिती द्वारा संगीत शिक्षक अजित खंदारे सर यांचा सत्कार गजानन महाराज सेवा समिती द्वारा संगीत शिक्षक अजित खंदारे सर यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.