काँग्रेस पक्षाचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पाेहचवा - चित्रा डांगेचे आवाहन : ब्रम्हपुरीत पार पडली महिला काँग्रेसची आढावा बैठक !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२७ सप्टें.) : काँग्रेस पक्षाचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पाेहचवा असे आवाहन जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा चित्रा डांगे यांनी महिला काँग्रेस आढावा बैठकीत केले .ब्रम्हपुरीतील विश्राम ग्रूहात एक महिला आढावा बैठक नुकतीच पार पडली त्यात त्या बाेलत हाेत्या.
या बैठकीला प्रामुख्याने तालुका महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मंगला लोणबले, ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा रीता उराडे, माजी नगराध्यक्षा वनीताताई ठाकूर हजर हाेत्या.
      
केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई झपाट्याने वाढली असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन गँस दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट पुर्णता बिघडले असल्याचे चित्रा डांगे म्हणाल्या.

आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस विजय मिळावा यासाठी ही महिला आढावा बैठक आयोजित करण्यांत आली हाेती.
सदरहु बैठकीचे सुत्रसंचालन शहर महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा योगीता आमले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जि.प.सदस्या स्मिताताई पारधी यांनी मानले.
 
पार पडलेल्या बैठकीला ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगरसेविका सुनिता तिडके, नगरसेविका सरीता पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका लता ठाकुर, भावना ईरपाते [माजी सदस्या जिल्हा परिषद चंद्रपूर] मंगला टिकले, स्नेहा मोटघरे, नयना गुरनुले, मंगला ईरपाते, पुष्पा गभने, विद्या चौधरी, सरिता पारधी, सुरेखा नागतोडे, बेबी माटे, गिता मेश्राम, तनुजा राऊत, दिपा कावळे, प्रतिभा कोडापे, सुधा राऊत सुवर्णा तुपट, अश्विनी फुलवले , पुनम कसारे, सोनाली सुर्यवंशी, धनश्री सिडाम आदीं महिला उपस्थित हाेत्या.
काँग्रेस पक्षाचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पाेहचवा - चित्रा डांगेचे आवाहन : ब्रम्हपुरीत पार पडली महिला काँग्रेसची आढावा बैठक ! काँग्रेस पक्षाचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पाेहचवा - चित्रा डांगेचे आवाहन : ब्रम्हपुरीत पार पडली महिला काँग्रेसची आढावा बैठक ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.