सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२७ सप्टें.) : वणी घुग्गुस मार्गावरिल लालगुडा गावाजवळ स्कॉर्पियो वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना आज २६ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. धडक एवढी जोरदार होती की, स्कॉर्पियोने ऑटोला रोडखाली नेत स्कॉर्पियो ऑटोवर चढली. यात कुणाचीही जिवीत हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्कॉर्पियोखाली ऑटो दबल्या गेल्याने ऑटो दिसून येत नव्हता.वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा वळण रस्ता अपघात प्रवणस्थळ झाला असून या वळण रस्त्यावर झाडेझुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. रोडच्या काठाने वाढलेली झाडे झुडपे तोडण्याची कुणीही तसदी घेत नसल्याने या वळण रस्त्यावर अपघात वाढू लागले आहेत.
वणी वरून घुग्गुसकडे जाणाऱ्या स्कॉर्पियो क्रं. MH ३७ G ३७१८ ने लालगुडा कॉलनीतून रोडवर येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पियोने ऑटोला रोडखाली नेत स्कॉर्पियो अक्षरशः ऑटोवर चढली. ऑटो पूर्णतः स्कॉर्पियोखाली दबल्या गेला. लालगुडा वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपं वाढली असल्याने आड मार्गाने येणारे वाहनचं दृष्टीस पडत नाही.
वणी घुग्गुस राज्य महामार्गाने वणी वरून घुग्गुस कडे भरधाव जात असलेल्या स्कॉर्पियोने लालगुडा कॉलनीतून रोडवर चढत असलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे.
वणी घुग्गुस रोडवरील लालगुडा गावाजवळ स्कॉर्पियोची ऑटोला जोरदार धडक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
