पांढरकवडा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची गठण

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०९ सप्टें.) : तालुक्यातील पांढरकवडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीच्या गठण दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही जादूटोणा, भूत, भानामती, बुवाबाजी, चमत्कार, गैरसमजुती, अनिष्ट रूढी परंपरा, यांच्याविरुद्ध लोकांचे प्रबोधन करून देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारे त्यांचा भंडाफोड करणे. तसेच अंधश्रद्धा व गैरसमजामुळे समाजात होणारी भांडणे, खुन, नरबळी, मारामाऱ्या, अशा प्रकारच्या अनेक घटना छढतांना आढळतात. त्यापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने समाज प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पांढरकवढा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

शाखेच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल कोमावर, प्रधान सचिवपदी अरविंद गांगुलवार, अध्यक्षपदी तुकारामजी नेहारे, उपाध्यक्षपदी चंद्रभानजी उदे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह चंद्रकांत कोयरे, विविध उपक्रम कार्यवाह रवि वल्लमवार.बुवाबाजी संघर्ष कार्यवाह पुरण राठोड. वार्तापत्र विभाग कार्यवाह यशपाल खांडे, प्रकाशने वितरण कार्यवाह अक्षय शिरपूरवार, प्रशिक्षण सहभाग कार्यवाह नंदकिशोर तुरणकर, सोशल मीडिया व्यवस्थापन रविंद्र सिडाम, महिला सहभाग कार्यवाह मंगला आंबेकर यांची सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पांढरकवडा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची गठण पांढरकवडा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची गठण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.