जिवती तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे  
जिवती, (०९ सप्टें.) : येथे तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे मा. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, विदर्भ महाविद्यालय जिवती येथील सभागृहात तालुक्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी तालुक्यातील सिताराम मडावी यांना जिल्हा महासचिव युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर, कंटू कोटनाके यांना अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी, बाजीराव वल्का यांना अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग जिवती, जब्बार शेख यांना अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जिवती, अकबर पठान यांना शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जिवती, श्यामराव गेडाम अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी जिवती, दत्ता भाऊ गिरी आणि विष्णू भाऊ रेड्डी यांना ओबीसी विभागाचे ग्रामीण अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील मडावी, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख मार्गदर्शक राजुरा नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, प.स. सभापती अंजनाताई पवार, सिताराम कोडापे,भाऊराव चव्हाण, अध्यक्ष तालुका काँगेस गणपत आडे, सुग्रीव गोतावडे, तिडके पाटील, अश्फाक शेख, अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस नंदाताई मुसने, प.स.सदस्य गोतावडे ताई, माधव डोईफोडे, सत्तरशहा कोटनाके, सिताराम मडावी, तजुद्दिन शेख, भीमराव पवार, दता टोगरे, दता गायकवाड, बंडू राठोड, डॉ.बन्सोड, बाळू पतंगे, कैलास कुंडगिरी, विजय राठोड, सुभाष राठोड, विलास वाघमारे, सुनील शेळके, विष्णू रेडी, रोहिदास आडे, जिवती तालुक्यांतील युवक, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिवती तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न जिवती तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on September 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.