सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (०९ सप्टें.) : तालुक्यातील मार्की (बु) येथील इंजि.जयंत सोमेश्वर उदकवार यांची पत्नी लीना लेंझे (उदकवार) ही चंद्रपूर येथील कमलादेवी शिक्षण महाविद्यालयातुन मिरीट मध्ये येऊन गावचे तसेच परिवाराचे नाव उंचावले आहे.
सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालयातून लीना लेंझे ही विद्यार्थिनी प्रथम मेरिट आली आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठातून सुद्धा क्रमांकावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बी.एड. अभ्यासक्रमाचा अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. बी. एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत सीजीपीए ८.८२ गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान लीना लेंझे हिने मिळवला आहे. एकीकडे तिने संसाराची गाडा चालवत असताना शिक्षणाची ओढ तुटू दिली नाही. लग्न होऊन ५ वर्ष झाले तरी सुद्धा तिने संसार सांभाळीत आपला अभ्यासक्रम योग्य रित्या पूर्ण करून घवघवीत यश प्राप्त केले. अनेक मुलींना तसेच स्त्रियांना लग्न झाल्यानंतर सुध्दा शिकून यश प्राप्त करता येते. याचे उत्तम उदाहरण तिने समाजापुढे ठेवले.
फक्त यासाठी जिद्द ,इच्छाशक्ती,चिकाटी तसेच राहत्या परिवाराची साथ असणे गरजेचे आहे.जर आपले कुटुंब आपल्या सोबत असेल तर मिरीट काय,या आयुष्यातील अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते.असा संदेश लीनाने आजच्या युवतींना व स्त्रियांना दिला आहे. लीनाच्या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
पुढील आयुष्यात एक उत्तम शिक्षक होण्याचे स्वप्न मनी बाळगले आहे.
तिच्या या यशाचे श्रेय व महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद तिचे पती जयंत उदकवार, सासरे सोमेश्वर उदकवार, सासू सुरेखा उदकवार, आई-वडील व माहेरील लोकांना दिले.
मार्की येथील लीना लेंझे (उदकवार) महाविद्यालयातून प्रथम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 09, 2021
Rating:
