टॉप बातम्या

...मात्र, याचा कवडीचाही फायदा शेतकऱ्यांना होत नाही - मनीष जाधव

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२२ सप्टें.) : आज सोयाबीन च्या दरात २७००/- रुपयांची घसरण करून शेतकऱ्यांच्या मेहनतीला त्यांच्या उत्पदनाला कवडी मोल करून टाकलं असे शेतकरी नेते मनीष जाधव आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतातून शेतमाल बाहेर पडले तर, शेतमालाचे दर पडतात हे आता नित्याचेच जणू परंपराच निर्माण झाली आहे थंड डोक्याने नियोजित पद्धतीने कट करून सर्व शेतमालाचे बाजारभाव पाडल्या जातात हा इतिहास आहे हमीभाव केवळ कागदावरच आहे शेतकर्‍यांच्या घरातील सर्व शेतमाल विकल्या जातो त्यानंतर हमी भावाचे शासकीय खरेदी केंद्र चालू होतात काटा मारी, कट्टी व कच्चा पावत्या पट्टीवर खेडा खरेदी पद्धती व व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत मूक संमतीने हे शेतमाल खरेदी व्यवहार होतात पण जेव्हा हे शेतमाल व्यापाऱ्याच्या गोडाऊनला जेव्हा सर्व शेतमाल साठवल्या जातो त्यानंतर मात्र हे दरवाढ होते प्रत्यक्षात मात्र याचा कवडीचाही फायदा शेतकऱ्यांना होत नाही आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना गत दोन वर्षांपासून कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ निसर्गाच्या लहरीपणाचा धोरणामुळे आलेली आहे होतं नव्हतं ते मातीत घातले आणि आज मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे राज्यकर्ते बेफिकर आहे आर्थिक दृष्ट्या शेतकरी उद्ध्वस्त होऊन हतबल व हवालदिल झाला आहे. कायद्याने शेतमालाला हमी भाव देऊन बाजारातील जोखीम हे शासनाने स्विकारावे व शेतकऱ्यांना कायद्याद्वारे केंद्राने हमी द्यावी. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या श्रमाला कष्टाला अर्थ नाही त्याच्या व्यथा-वेदना अंत नाही. 
अशी खंतही मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांनी व्यक्त केली आहे.
Previous Post Next Post