•...तर न्याय मिळत नसल्याने बोटोणी'करांचे मारेगाव येथे उपोषण


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२२ सप्टे.) : बोटोणी येथील नागरिकांचे मागील पाच वर्षांपासून तेंदूपत्ता बोनस मिळत नसल्याने हा बोनस यावेळी तरी तात्काळ मिळावा याकरीता तसेच बोटोणी आरोग्य उपकेंद्र नियमित सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी येथील नागरिकांनी उपोषणाला सुरुवात आज दि.२१ सप्टेंबर पासून केली आहे.

मागील २०१५ पासून येथील मजुरांचा तेंदूपत्ता बोनस कायम रखडला आहे, असे उपोषण कर्त्यांचे म्हणणे असून, मागील पाच वर्षात सिरतल ट्रेडिंग कंपनी पांढरकवडा यांनी सन २०१५ ते २०१७ पर्यंत कंत्राट घेतला. त्यानंतर नागपूर येथील अपरोज कंपनीने सन २०२० पर्यंत तेंदूपत्ता खरेदीचा कंत्राट घेतला होता. सन २०१५ मध्ये बोटोणी ग्रामपंचायतची पेसा अंतर्गत कायद्यात रूपांतर झाले. मात्र, या ग्रामपंचायतमध्ये तत्कालीन सचिव व सरपंच यांच्या ढिसाळ पणामुळे जवळपास १२० मजूर तेंदूपत्ता बोनस पासून वंचित राहिले. असे उपोषणास बसलेल्यानी सांगितले. ते पुढे म्हणाले की, याबाबत वारंवार विचारणा केली असता थातूर मातुर उत्तरे देऊन मजुरांना आजतागायत वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

सदर मजूर मागील पाच वर्षांपासून तेंदूपत्ता बोनससाठी प्रशासन दरबारी येजा करीत आहे. मात्र, त्यांना न्याय मिळत नसल्याचे दिसत असल्याने अखेर या बोनससाठी व येथील आरोग्य उपकेंद्र स्थानांतरण करण्यात आल्यागत ते पूर्ववत सुरू करण्यासाठी पंचायत समिती समोर कालपासून उपोषणाला सुरुवात झाली असून, यामध्ये भास्करराव सिडाम, केशव भसारकर, केशव खंडाळकर, दिवाकर आस्वले आदींचा सहभाग आहे.
जाहिरात : बर्थडे 
•...तर न्याय मिळत नसल्याने बोटोणी'करांचे मारेगाव येथे उपोषण •...तर न्याय मिळत नसल्याने बोटोणी'करांचे मारेगाव येथे उपोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.