एकाच तारखेला घेतलेली टीईटी यूपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थी अडचणीत


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बल्लारपूर, (२२ सप्टें.) : शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन वर्षानंतर १० ऑक्टोंबर ला होणार आहे मात्र याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेचे आयोजन केले आहे टीईटी देणारे बहुतांश भावी शिक्षकांनी युपीएससी साठीही अर्ज केला असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टीईटी झाली नव्हती त्यामुळे १० ऑक्टोंबर ला होणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. एका वर्षात साधारण सात लाख उमेदवार परीक्षेला बसतात परीक्षा दोन वर्षांनी होणार असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात वर्तविले जात आहे.

बीएड ,डीएड अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरतात. काही वर्षापासून शिक्षक भरती बंद होते होती तसेच दोन वर्षापासून टीईटी झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वळला त्यामुळे यूपीएससी देणारे विद्यार्थी सुद्धा बहुतांश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षेच्या २७ जून ला रद्द झालेल्या पेपर १० ऑक्टोंबर ला घेण्यात येणार आहे त्यामुळे टीईटी आणि यूपीएससी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी मध्ये गोंधळ उडाला आहे.

 दोन वर्षानंतर घेण्यात येणारी टीईटी आणि यूपीएससी पूर्वपरीक्षा एकाच तारखेला असल्याने परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सिद्धांत पुणेकर यांनी मा. तहसीलदार बल्लारपूर यांच्यामार्फत मा. तुकाराम सोपे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली.

यावेळी उदय भगत, स्वप्निल सोनटक्के, प्रथम दुपारे आदी उपस्थित होते.
एकाच तारखेला घेतलेली टीईटी यूपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थी अडचणीत एकाच तारखेला घेतलेली टीईटी यूपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थी अडचणीत Reviewed by सह्याद्री चौफेर on September 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.