सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२२ सप्टें.) : संपूर्ण जिल्हासह पांढरकवडा शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकणगुनिया यासारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याकरिता वॉर्डनिहाय गावातील प्रत्येक घरी भेट देण्याकरिता नगर परिषद पांढरकवडा व आरोग्य विभाग यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून, पथक आपल्या घरी आल्यानंतर त्यांना आपण सहकार्य करावे. विचारलेली माहिती द्यावी. घरात, अंगणात व परिसरातील जागा दाखवून द्यावी जेणेकरून डेंग्यू,मलेरिया उत्पत्तीच्या डासांचे नायनाट करण्यात येईल. पथकाद्वारे टेमिफोस ऍक्टिव्हिटी, फोगिंग, स्प्रेइंग करण्यात येईल.
शहरातील सुज्ञ नागरीकांनी डेंग्यू व मलेरिया या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील साचून असलेल्या पाण्यात होत असल्यामुळे डेंगू, मलेरिया डासाची उत्पत्ती स्थान समूळ नष्ट करावे. आपल्या घरातील व अंगणातील कुंड्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठवून ठेवलेले भांडे झाकून ठेवावे. निरुपयोगी टायर्स नारळाच्या करवंट्या काचेच्या प्लास्टिकच्या वस्तू घरातून परिसरातून काढून फेकून द्यावे. घरातील कुलर टबमध्ये पाणी असल्यास कुलर टब पालथी करून ठेवावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा व घरातील सर्व भांडी कोरडे करून ठेवावे. जेणेकरून, डासांची अंडी भांड्याला चिकटून राहणार नाही. मॉस्किटो बॅट व कॉइल चा वापर करावा. डास पळवणार्या धूप, अगरबत्ती यांचा वापर करावा. रोगांची कोणते ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करावा.
घरातील सेफ्टीक टाक्याचे पाईपवर जाळी बसविण्याचे काम नगर परिषद मार्फत सुरू असून येणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. वरील सर्व सूचनांचे पालन केल्यास शहरातून डेंग्यू व मलेरिया नक्कीच हद्दपार होईल याकरिता सर्व नागरिकांनी नगर परिषदेला व प्रशासनास सहाय्य करावे असे, आव्हान नगराअध्यक्षा सौ.वैशाली अभिनय नहाते व नगर परिषद मुख्याधिकारी श्री.राजू मोट्टेमवार यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.
पांढरकवडा शहरात डेंग्यू,मलेरियाचे साम्राज्य
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
