सर्पमित्राने दिले कोब्रा विषारी सापाला जीवदान

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२४ सप्टें.) : तालुक्यातील वागद इजारा येथे शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या राहत्या घरी विषारी कोब्रा जातीचा साप आढळल्याने त्याला जीवाने न मारता सर्प मित्र जगदीश राठोड यास बोलावून हा सर्प रेस्क्यू करण्यात आला.

निसर्गामध्ये सापांच्या विविध प्रजाती आढळतात यापैकी ९५ % सर्प हे महाराष्ट्रातील बिनविषारी असल्याचं मत हे सर्पमित्र जगदीश राठोड यांनी बोलून दाखवलं साप बद्दल लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज असून साप निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सरपटणारा प्राणी आहे शेतकऱ्यांचा तो मित्र असून त्याच्या प्रजाती बद्दल ओळख होऊन त्याच्या बद्दलची भीती समाजातली कमी व्हावी यासाठी वनविभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी सर्पमित्र जगदीश राठोड यांनी व्यक्त केली
सर्पमित्रांना वन विभागाच्या माध्यमातून अधिकृत ओळख पत्र देण्यात यावे व शासनाकडून योग्य ते संरक्षण भौतिक साधन सुविधा व विमा उतरविण्यात यावा मिळाव जेणेकरून एखाद्या वेळेस रेस्क्यू करताना काही अपघात झाला तर जोखीम पत्करता यावे.
आज हि सर्प रेस्क्यु मोहीम पूर्ण करताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अल्पावधीतच हा सर्प जगदीश राठोड सर्पमित्र याने रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.

यावेळी मनीष भाऊ यांनी जगदीश राठोड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन निसर्गाच्या व निसर्गातील विविध जैवि विविधता संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा असा आशावाद व्यक्त केला व एका निष्पाप सापाला जीवदान दिले.


सर्पमित्राने दिले कोब्रा विषारी सापाला जीवदान सर्पमित्राने दिले कोब्रा विषारी सापाला जीवदान Reviewed by सह्याद्री चौफेर on September 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.