सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२४ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा, येथील कृषिदुत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु . वैभव रविंद्र मुसळे या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील गुरांचे महत्त्व स्पष्ट करून त्यांच्या बद्दल घ्यावयाची काळजी व लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले शेतीच्या कामाच्या वेळी बैल हा सुदृढ असला पाहिजे पावसाळ्यात गुरांवर विविध आजार येतात त्या पासून कसा बचाव करायचा कोणत्या आजारावर कोणती लस उपयुक्त ठरते त्यांना चारा काय व किती प्रमाणात द्यायला हवा दुधाळ जनावरांची विशेष काळजी कशी घेतली पाहिजे इत्यादी गोष्टींबाबत माहिती देऊन लसीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
माहिती कार्यक्रमा दरम्यान डॉ. भोयर सर, गावातील शेतकरी समीर गाहोकार, पोलिस पाटिल रमेश मुसळे, पुंण्डलिक वासेकार, बबन वासेकार, राजेंद्र मुसळे, रविंद्र मुसळे, लखन वासेकार, तसेच इतर गाव करी बंधू उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. दत्ता जाधव, प्रा. शुभम शिरपुरकर, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. स्नेहल आत्राम, प्रा. काजल माने, प्रा. गायत्री इंजालकर या शिक्षकांचे या विद्यार्थ्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृषीदुता तर्फे जनावरांचे लसीकरण करून शेतकऱ्यांना लासिकरणाबाबत मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2021
Rating:
