छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरणाच्या मागणी साठी प्रहार करणार रक्तदान आंदोलन !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२४सप्टे.) : संपूर्ण देशाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्य करण्यांचे काम गडचांदुर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. परंतु येथील नगर प्रशासन व आजी माजी सत्ताधारी यांच्या उदासिन धाेरणामुळे एकाच जागेचे एकदा नव्हे तर चक्क दोनदा भूमिपूजन झाले, ही वस्तुस्थिती आहे.

अनंत अडचणींमुळे हे काम लांबणीवरच पडत असल्याचे एकंदरीत दिसून येते. सौंदर्यंकरण्यांच्या कामाला अजुन प्रशासनाला मुहुर्त मिळाला नाही नगर प्रशासन व सत्ताधारी या बाबत एव्हढे सुस्त व उदासिन का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडुन आता विचारल्या जात आहे.

संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा सौंदर्यकरणांच्या कामाची सुरुवात येत्या पंधरा दिवसात झाली नाही तर, प्रहार संघटने कडुन रक्तदान आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहरचे सतीश बिडकर पंकज माणूसमारे, सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, इंजी.अरविंद वाघमारे, महदेव बिस्वास, अनुप राखूंडे, सूरज बार, नितेश कोडापे, वअन्य प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरणाच्या मागणी साठी प्रहार करणार रक्तदान आंदोलन ! छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरणाच्या मागणी साठी प्रहार करणार रक्तदान आंदोलन ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.