शेकडाें याेजना कर्मचा-यांचा धरणा आंदाेलनात सहभाग, एक दिवशीय आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४ सप्टें.) : शासनाचे वतीने एकात्मिक बाल विकास याेजना, राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियान, शालेय पाेषण आहार, महात्मा गांधी राेजगार हमी याेजना व सर्व शिक्षा अभियान या महत्वपूर्ण तथा आवश्यक याेजना आंगणवाडी सेविका, मदतनिस आशा वर्कर, गटप्रवर्तक, ग्राम राेजगार सेवक आदीं मार्फत राबविल्या जाते ही वस्तुस्थिती आहे. या याेजने अंतर्गत काहींना मानधन तरं काहींना कामाच्या आधारावर माेबदला देण्यांत येताे. मिळणारा माेबदला व मानधन हे कमी स्वरुपाचे व तुटपुंजे असुन किमान वेतन अद्याप काेणालाही दिल्या गेले नाही. दिवसांगणिक वाढती महागाई व याेजना कर्मचाऱ्यांकडील कामाचा अव्वाढव्य व्याप बघता त्यांना २१ हजार किमान वेतन लागु करा, याेजना कर्मचाऱ्यांना पेंशन लागु करा व महागाईला आळा बसवा, या प्रमुख मागण्यांसाठी आज शुक्रवार दि. २४ सप्टेंबरला दुपारी १ वाजता सिटुच्या माध्यमांतुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात याेजना कर्मचारी वर्गांनी धरणा आंदाेलन केले.
या आंदाेलनाचे नेत्रूत्व प्रामुख्यांने प्रमाेद गाेडघाटे, राजेश पिंजरकर, संध्या खनके, राकेश जांभूळकर, प्रणिता लांडगे यांनी केले. उपरोक्त आंदोलन यशस्वि करण्यांसाठी सायली बावणे, माधुरी कवासे, रफिका कुरेशी, बंडु पहानपटे, शैला दुर्गे, शुभभावना कुरेकार, सुशिला कर्णेवार, वर्षा तिजारे, पुरुषोत्तम आदे यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातील शेकडाें याेजना कर्मचा-यांनी सदरहु आंदाेलनात आपला सहभाग नाेंदविला हाेता. आजच्या या आयोजित आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले हाेते. हे मात्र, तेवढेच खरे..
शेकडाें याेजना कर्मचा-यांचा धरणा आंदाेलनात सहभाग, एक दिवशीय आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष शेकडाें याेजना कर्मचा-यांचा धरणा आंदाेलनात सहभाग, एक दिवशीय आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on September 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.