रश्मीताई ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या मार्फत कॅन्सर ग्रस्त बालकाला मदत.


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२३ सप्टें.) : सोशल मीडियाच्या माध्यमातुन वायरल झालेल्या शिंदोला येथील बालक युग हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे, ५ वर्षीय युग कैलाश मालेकर याला कँसर या आजाराने ग्रासले आहे. युग चे वडील कैलाश मालेकर हे भूमिहीन असून,अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे. त्यांना आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, मोठया शहारत मुलाला भर्ती करून औषध पाणी व प्रवासी वाहतुकीसाठी लागणारा खर्च हा अवाक्या बाहेर असल्याने त्याला या संकट समयी माणूसकी या नात्याने आर्थिक मदत करणे फार गरजेचे आहे.

याच सामाजीक जाणीवेतून एक हात मदतीचा पुढे करित युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी रश्मीताई उद्धव साहेब,ठाकरे व युवासेना सचीव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युग चे वडिल यांना आर्थिक मदत केली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे,माजी उपजिल्हाप्रमुख दिपक भाऊ कोकास, शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर उपस्तीत होते.
रश्मीताई ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या मार्फत कॅन्सर ग्रस्त बालकाला मदत. रश्मीताई ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या मार्फत कॅन्सर ग्रस्त बालकाला मदत. Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.