राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील खड्डे बुजविण्यासाठी युवक काँग्रेस चे पांढरकवड्यात आंदोलन

सह्याद्री न्यूज । रवि वल्लमवार 
केळापूर, (२३ सप्टें.) : राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ (६) वर पिंपळखुटी ते वडकी या मध्ये मोठेमोठे खड्डे पडले आहे. सदर ह्या खड्ड्यामुळे रोजच अपघात घडत असुन त्यास अनेकांना आपले प्राणास मुकावे लागले असून काही जणांना अपंगत्व झाले आहे व आणखी किती जनाचा बळी व अपंगत्व घेणाचा मानस आहे.

सदर ६ च्या हायवेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने येथे खड्डे पडले असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कंत्राटदार व अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. वरील ह्या खड्डया करीता अनेक वृत्तपत्रात बातम्या देवूनही दुर्लक्ष केल्या जात आहे सदर पावसाळ्याचे दिवस असल्याने आणखी अपघात होण्याची शक्यता जास्त आहे व आणखी लोकांचा जिव जाण्याचे शक्यता नाकारता येत नाही आणि स्थानिक लोकांनी सुरक्षा करीता मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात यावे यासाठी पांढरकवडा शहरात आंदोलन करून तहसील कार्यालय पांढरकवडा व बांधकाम विभाग पांढरकवडा येथे आज २२ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. सदर येत्या १० दिवसात म्हणजेच ०२ ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी पिंपळखुटी ते वडकी पर्यंतचे खड्डे कायम स्वरूपी बुजविण्यात यावे. जर खड्डे बुजविले नाही तर केळापूर तालुका युवक कांग्रेस तर्फे बेशरमाचे झाडे लावून महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा थेट इशारा ही देण्यात आले आहे.

यावेळी शिण्णु अण्णा नालमवार युवक काँग्रेस महाराष्ट्र महासचिव, बिशनसिंग शिंदो, इक्रम अली, मनोज भोयर, विपिल चिंतावार, प्रेम राठोड, राजु तालकोकुलवार, अवि पाटील, धनराज चव्हाण, कवलजित सिंग, राज मिसेवार, समीर चंदरणे, स्वप्निल गौरवार, निलेश उमरे, शंकर सोयाम, राहुल भुसारे, शिवकेश चव्हाण, सौरभ पुट्टेवार, रघुनाथ किनाके, मनोज राठोड, मुन्ना शेख, शहबत खान, प्रफुल्ल रेकुलवार, संतोष तालकोकुलवार, पवन तालकोकुलवार व इतर युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील खड्डे बुजविण्यासाठी युवक काँग्रेस चे पांढरकवड्यात आंदोलन राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील खड्डे बुजविण्यासाठी युवक काँग्रेस चे पांढरकवड्यात आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.