सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
वणी, (६ सप्टें.) : महाराष्ट्र राज्य वन संस्था कर्मचारी व वन कामगार युनियन या संघटनेची वार्षिक साधारण सभा दिनांक ०५/०९/२०२१ रोजी रविवार ला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना जुने सचिवालय परिसर बॅरक क्रमांक ११-१२ सिव्हील लाईन नागपूर ४४०००१ यांचे कार्यलयात दुपारी ठीक १:०० वाजता खालील विषयावर घेण्यास ठरविले आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.सभेचे कामकाज चालविण्याकरिता सभा अध्यक्षाची व मागील वार्षिक साधारण सभेचे अहवाल वाचून निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वन संस्था कर्मचारी व कामगार युनियन नागपूर अध्यक्ष पदी प्रल्हादजी शेंडे, उपाध्यक्ष राहुल गेडाम, महासचिव अशोकजी कन्नाके, सचिव दुर्गेश करपाती, सहसचिव कु.भाग्यश्री लेखामी कोषाध्यक्ष चंद्रशेखर मडावी, कार्यकारणी सदस्य ऍड. सुधाकर धांडे, श्री.जी.बी.जांबोडे, श्री.गजानन काकड, योगेश मडावी, मुंशी दुर्वा, सदर निवडणूक प्रक्रिया शांतपणे व खेळीमेळीच्या वातावरणा पार पडली.