टॉप बातम्या

पंतप्रधान मोदीजींना पोष्टाने गोवऱ्या पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला गॅस दरवाढीचा निषेध


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०६ सप्टें. ) : दिवसेंदिवस गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाल्या असून केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नुकताच मुख्य पोष्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके शहराध्यक्ष सुनीता नरडे तालुका अध्यक्ष सुशीला टेलमोरे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पोष्टाने`शेणाच्या गोव-या’ पाठवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. 
  
यापूर्वीच चंद्रपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. पण केंद्राच्या वतीने त्याची दखल घेतली नसल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा उद्रेक या आंदोलनाच्या रुपाने होत आहे. सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिला आहे घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून हे दर प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. सात वर्षात सिलेंडरची किंमत 410 रुपायां वरून 884.50 रुपयावर पोहोचली. गेल्या सात वर्षात दुपट्टीने सिलेंडरची दरवाढ केली असून सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही. सदरहु दरवाढ जीव घेणारी आहे. मोदीजी सर्वसामान्य जनतेने आदिमानवा सारखे कंदमुळे खाऊन जगायचे का ? असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी केला. 

यावेळी आंदोलनात उपस्थित प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल दहेगावकर वी जे एटी सेलच्या विदर्भ अध्यक्ष रंजना पार्शिवे माजी नगराध्यक्ष जनाबाई पिपळशेंडे, माजी नगरसेविका लता हिवरकर साखरकर, मडावी, महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Previous Post Next Post