इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा व ईरावियो क्लिनिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य" जागृती कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे    
वरोरा, (०६ सप्टें.) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने चार शिक्षकांना सन्मानित केले. त्याच बरोबर महिलांमध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी "ईरावियो क्लिनिक नागपूर" यांच्या सौजन्याने सेमिनार आयोजित करण्यात आला.

यात डॉ.आशिष चवरे व डॉ.निरज गेचोडे यांनी महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वतः च्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ताणतणाव कसा दूर करावा, मानसिक आरोग्य कसे जपावे, दैनंदिन जीवन कसे असावे व बऱ्याच संवेदनाक्षम विषयांवर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. तसेच कॉस्मेटिक स्त्रीरोग, केस गळतीवर उपचार, त्वचेवर उपचार, प्लेस लेसर उपचार यावर अतिशय उपयुक्त माहिती दिली. या सेमिनार ला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सेमिनार चा लाभ १४० महिला व तरुणींनी घेतला. कार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज तर आभार प्रदर्शन सौ. दिपाली माटे यांनी केले. 
           
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब च्या अध्यक्षा सौ. मधु जाजू, सेक्रेटरी सौ. वंदना बोढे, दिपाली माटे, स्नेहल पत्तीवार, झेनब सिद्दिकोट, माया बजाज, अपेक्षा पांपट्टीवार, प्रणाली बेदरकर, हर्षदा कोहळे, आभा सामोरे, अर्चना ठाकरे व अन्य सदस्या उपस्थित होत्या.
इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा व ईरावियो क्लिनिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य" जागृती कार्यक्रमाचे आयोजन इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा व ईरावियो क्लिनिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य" जागृती कार्यक्रमाचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.