सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०६ सप्टें.) : राज्यात सलग दाेन वर्षापासून महाभयानकचे काेराेनाचे संकट निर्माण झाले आहे .त्याची झळ चंद्रपूर जिल्ह्यालाही पाेहचली आहे.अद्याप काेराेना संपलेला नाही .प्रत्येकांच्या मनात आज ही काेराेनाची भिती आहे. अश्यातच सणासुदीचे दिवस आले आहे दाेन वर्षापूर्वी हेच सण नागरिकांनी माेठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले आहे.
बालगाेपलांचा आवडता सण तान्हा पाेळा काही तासांवर येवू घातला आहे. याच निमित्ताने काल रविवारी दुपारी प्रतिनिधीने चंद्रपूरच्या स्थानिक गाेलबाजाराचा फेरफरका मारला असता बाजारात म्हणावी तशी ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. महानगर पालिका परिसरात विक्रीसाठी नंदी बैल विक्रीला उपलब्ध झाले आहे. पण त्या ही ठिकाणी ग्राहकांची गर्दी काल सायंकाळ पावेताे द्रूष्टीक्षेपात पडली नाही. एका लाकडी नंदी बैलाची किंमत अंदाजे १०००/- रुपयांपासून तर पंधरा हजार रुपयांपर्यत असल्याचे एका व्यापा-यांने भेटी दरम्यान सांगितले. काेराेनाच्या पाश्व्रभूमिवर प्रशासनाने देखिल सार्वजनिक स्वरुपाचा पाेळा साजरा न करता घरीच पाेळ्याचा सण साजरा करण्यांचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यामुळे साहजिकच बालगाेपालांचा आनंदावर विरजन पडले आहे. शहरातील काही भागात सामाजिक संस्था व मंडळाच्या वतीने नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यांत येत हाेती ती देखिल या वर्षि हाेणार नाही एकंदरीतच बालगाेपलां साेबत माेठ्यांचा देखिल उत्साह या काेराेना संकटामुळे मावळला आहे.
ग्रामीण भागासह शहरातील रस्ते पाेळ्या निमित्त दरवर्षि गर्दीने फुलुन दिसून येत हाेते. परंतु या वर्षि मात्र तसे चित्र दिसून येणार नाही. बैलसजावटीचे नानाविध साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे पण त्यास ग्राहकांचा तसा प्रतिसाद नसल्याची खंत प्रफुल टिपले व राजू तपासे या छाेट्या व्यापा-यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केली.
यंदाही पाेळा सणावर काेराेनाचे सावट ,शेतक-यांसह छाेट्यांचा उत्साह मावळला !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 06, 2021
Rating:
