टॉप बातम्या

चिमूर-ब्राम्हणी अडेगांव (देश) रस्ता त्वरित दुरुस्त करा : अन्यथा आंदोलन छेडू प्रहारचा इशारा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१६ सप्टें.) : जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) ह्या रस्त्याची अवस्था फार बिकट दयनीय झाली असून, सदरहु रस्ता एक प्रकारे अपघाताला आमंत्रण देत आहे. परंतु या रस्त्या कडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
   
रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता अअसा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष चिमूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा, इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आज गुरुवार दि.१६ सप्टेंबरला तहसीलदार यांना एका लेखी निवेदनातुन दिला आहे.
त्यामुळे तहसीलदार काय ठोस पाऊल उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करतांना अशिद मेश्राम, सोमेश्वर डाहूले, हिरामन दडमल व अन्य प्रहार सेवक उपस्थित होते.
Previous Post Next Post