सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : वांजरी शिवारात दिवसेंदिवस जनावरांवर हल्ल्याच प्रमाणात वाढलेलं आहे. जंगलालगत व माळा लगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे अतिशय कठीण झाले.अशा वातावरणात शेतात जाणे कठीण झाले आहे. जणांवरांवर हल्ले महिन्याला आठवड्याला होत आहे. ती वेळ माणसावर येऊ नये. या करिता वनविभागाने तात्काळ योग्य ते पाऊल उचलणे तितकेच महत्वाचे आहे. श्री.बाबुराव ढवा आत्राम रा.वांजरी या शेतकऱ्यांच्या बैलावर वाघाने प्राणघातक हल्ला केला परंतु जिवाच्या आकांताने बैल घरी पळून आला आणि जीव वाचला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांने तात्काळ शेतकऱ्यांच्या घरी धाव घेतले. जणांवरांवर तात्काळ खाजगी उपचार करण्यात आले. सदर हल्ल्याचे प्रकरण या पुढे घडू नये. याकरिता, वनविभागाने आपल्या टीम द्वारे गावात येऊन लोकांना जनजागृती करणे व विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वांजरी शिवारात जंगलालगत असलेल्या शेतात भीतीचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता शेतकऱ्यांना वॉलकंपाउंडची गरज आहे. ती वनविभागाने त्वरित करून देण्याची मागणी वांजरी ग्रामस्थ करत आहे.
वांजरी शिवारात वाघाने केला बैलावर हल्ला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
