सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२८ सप्टें.) : पावसाळ्यात अति पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे दैणादीन अवस्था झाली आहे. शेतात लागलेला माल हातात येणे अवघड झाले आहे. कापूस सोयाबीन ही नगदी पिकांची अति पावसामुळे वाट लागलेली दिसून येत आहे. शेतीला लावलेली रक्कम निघणे कठीण झाले आहे. ओल्या दुष्काळामूळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
बळीराजा शेतीसाठी बँकेतुन व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आता शासन ''मायबाप'' समजून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. नाहीतर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्ती ठरेल. शेतकरी देशाचा कणा आहे. तो कणा मोडला गेला तर देशाचा आर्थिक विकास कोलमोडायला वेळ लागणार नाही.कोरोना काळात देश आर्थिक संकटात होता भारताचा GDP हा अतिशय खालावला होता.
भारत देशाचा बळीराजा हा देशाची लाज राखला. आज तो बळीराजा निसर्गाच्या प्रकोपामुळे संकटात आहे. त्याला आज एक मदतीचा हात देणे तितकेच महत्वाचे आहे.
पांढरकवडा तालुका ओलादुष्काळ जाहीर करा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
