सोंडो येथील आदिवासी महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या उडूतवार व इतर आरोपी वर कठोर कारवाई करण्यात यावी - गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (१२ सप्टें.) : राजुरा तालुक्यातील सोंडो येथील आदिवासी महिला सुनीता मेश्राम यांना शरीर सुखाची मागणी करणारा सोंडो येथील दारू तस्कर, गुंड प्रवृत्तीचे असून गावातील आदिवासी महिलेकडे नेहमी वाईट नजरेने पाहतो. अशी तक्रार महिलांकडून प्राप्त झाली. सदर व्यक्ती हा तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत शरीर सुखाची मागणी केली.
महिलेने चक्क नकार देत प्रतिप्रश्न करत आव्हानात्मक तोंड देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या गुंड प्रवृतीच्या उडूतवार व्यक्तीने ती आपल्याला काय करणार या हेतूने लाथा - बुक्यांनी तिच्या कुशीवर बेदम मारहाण केली. त्यामुळे तिची गंभीर असून ती चंद्रपूर येथे दवाखाण्यात भरती आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालूकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम, हनुमंत कुमरे व प्रा. डॉ. प्रकाश वट्टी यांच्यासह गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या शिष्टमंडळाने सुनीता मेश्राम यांच्या कुटुंबियांची भेटली घेतली.
यावेळी सदर घडलेल्या घटनेची माहिती तिच्या आईने शिष्टमंडळाला कळवली. सोंडो हे गाव विरूर स्टे. पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने तेथील पोलीस ठाणेदार घडलेल्या घटनेसंदर्भात काय कार्यवाही केली याबाबतीत विचारणा केली असता त्यांनी दोन व्यक्तींवर अट्रॅसिटी ऍक्ट कायदया अंतर्गत अटक केली आहे. बाकी तपास सुरु आहे, आम्ही आरोपीना सोडणार नाही, आरोपी वर कठोर कारवाई करत आदिवासी महिलेला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही ठाणेदार राहुल चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिली.
आरोपी वर कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके दिला.
सोंडो येथील आदिवासी महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या उडूतवार व इतर आरोपी वर कठोर कारवाई करण्यात यावी - गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 12, 2021
Rating:
