सरस्वतीच्या चेह-यावर मदत मिळताच हास्य फुलले!

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१२ सप्टें.) : सरस्वती येरमे नावाची ७०वर्षिय महिला ! शहरातील स्थानिक सावित्रीबाई चौक(इंदिरा नगर) चंद्रपूर येथील ती मुळ रहीवासी ! घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य, गरिबीचे चटके सहन करीत ती कशीतरी आपले आयुष्य कंठीत आहे. अश्यातच या विधवा महिलाच्या घराचे छत गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या अवस्थेत आहे. तरी ती सातत्याने याच घरात वास्तव्य करीत आहे. तिची ही परिस्थिती बघता चंद्रपूरच्या यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटने मार्फत या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान अपक्ष आमदार तथा चंद्रपूरचे, लोकनेते किशोरभाऊ जोरगेवार यांना यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते जितेश कुळमेथे यांनी सदरहु महिलेची परिस्थिती कथन केली. तेव्हा आमदारांनी जात, धर्म, वंश, परंपरा या ही पलिकडे जाऊन एक सामाजिक दायित्व जोपासत त्या महिलेच्या घराला कायमस्वरूपी छत बनवून देण्यांचा निर्णय घेतला. या शिवाय लोखंडी टिन व इत्तर घराचे सर्व साहित्य देवून तात्काळ मदत केली.

इंदिरा नगर येथील जेष्ठ नागरिक सिद्धार्थ मेश्राम, राम वारजूरकर, पंकज चटप, बंडू पेंदाम, युवराज वरखडे, गोमदेव थेरे यांचे हस्ते नुकतेच सरस्वती येरमे यांना लोखंडी टिन व इत्तर साहित्य देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे नरेश आत्राम, रुपेश मलकावार, वसिम कुरेशी, अतुल बोदे, बंटी रहांगडाले, सतीश सोनटक्के, नितेश बोरकुटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सरस्वतीच्या चेह-यावर मदत मिळताच हास्य फुलले! सरस्वतीच्या चेह-यावर मदत मिळताच हास्य फुलले!  Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.