युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या तत्परतेमुळे एसटीचा टळला अपघात, बस प्रवाशांचे वाचले प्राण

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१२ सप्टें.) : युवासेना उपजिल्हा प्रमुख यांच्या तत्परतेमुळे एस टीबस चा होणारा संभाव्य अपघात टळला. यावेळी बस मध्ये 30 ते 40 प्रवाशी होते. 

सविस्तर असे की, वणी वरोरा चंद्रपूर बस क्र.एम एच 40 एन 8258 ही बस वणी आगारातून निघाली, या बस मध्ये जवळपास ३० ते ४० प्रवासी बसले होते. मात्र, बस चा वाहकाच्या बाजूचा धावणारा चक्का (टायर) तिरपट चालत असल्याचे युवासेने चे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वणीतील शिवाजी चौक येथे असतांना लक्षात येताच त्यांनी तत्परतेने क्षणाचा विलंब न करता त्या बस चा पाठलाग करून वरोरा रोड एल. टी. कॉलेज जवळ बस चालकाला गाडी थांबवाण्यास सांगून बस बाजूला उभी करून वाहकाच्या बाजूचा बसचा चक्का (टायर) बेंड असल्याचे निदर्शनास आणून दिले. चालकाने बघताच आपण सगळे बचावलो व पुढील होणारा अपघात टळला. असा निसुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, प्रवाशांना एसटी बस मधून उतरून दुसऱ्या बसमधून पाठविण्यात आले आहे. असे युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी 'सह्याद्री न्यूज' बोलतांना सांगितले. 

यावेळी बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले असून, किमान ४० ते ५० बस प्रवाशी होते. दरम्यान, आपल्या प्रसंगाअवधानाने आमचे प्राण वाचले असे, प्रवाशांनी यवतमाळ उपजिल्हा प्रमुख शेंडे यांचे उपस्थित प्रवाशांनी, चालक वाहक यांनी आभार मानले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे राकेश तावडे सौरभ वानखेडे यांच्या तत्परतेने बस प्रवाशांचे प्राण वाचल्यामुळे युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या तत्परतेमुळे एसटीचा टळला अपघात, बस प्रवाशांचे वाचले प्राण युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या तत्परतेमुळे एसटीचा टळला अपघात, बस प्रवाशांचे वाचले प्राण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.