खळबळजनक! उभ्या असलेल्या ट्रक मध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवढा, (१२ सप्टें.) : राज्य महामार्गावर गेल्या तीन दिवसा पासून उभ्या असलेल्या ट्रक मध्ये चक्क एका ५० वर्षीय अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृत्युदेह आढळल्याची खळबळजनक घटना केळापूर तालुक्यात करंजी जवळच मंगी फाटाच्या समोर असलेल्या महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोर काल (ता.११ सप्टें.) ला उघडकीस आली.

करंजी (मंगी) येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या समोर महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून TN 52U 6998 या क्रमांकाचा ट्रक उभा होता. या उभ्या असणाऱ्या ट्रक मध्ये चक्क! एका अंदाजे ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू्देह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. सदर ट्रक च्या केबिन मध्ये मृत अवस्थेत असणाऱ्या व्यक्ती चा मृत्यू हा तीन दिवसा पूर्वीच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. दरम्यान घटनेचा पंचनामा करून त्या अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूदेहाला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृत्युदेह हा पूर्णतः कुजण्याच्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली असल्याचे बोलल्या जाते.

सदर ट्रक मध्ये मृत्युदेह आढलेल्या त्या अज्ञात व्यक्तीची कुठलीच ओळख पटली नसून पुढील तपास पांढरकवडा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक बांरीगे करत आहे.
खळबळजनक! उभ्या असलेल्या ट्रक मध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह खळबळजनक! उभ्या असलेल्या ट्रक मध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.