पुरस्कार विजेती कु.कल्याणी सराेदेचे अनेकांनी केले काैतुक व अभिनंदन !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१२ सप्टें.) : उपराजधानी नागपूर समिपच्या कन्हान कांद्री येथील मुळ रहिवाशी असलेल्या तथा महाराष्ट्रातील प्रख्यात बेस्ट मेकअप आर्टीस्ट कु. कल्याणी सराेदे यांना नुकताच इंटरनेशल ग्लोरी (अवार्ड२०२१) सेलिब्रिटी मेकअप आर्टीस्ट अवार्ड प्राप्त झाला आहे. याच निमित्ताने नागपूर संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या एका छाेट्याखानी कार्यक्रमात तिचे काैतुक व अभिनंदन करण्यांत आले. कल्याणी महीला आघाडी नागपूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा असून, त्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं कलाकुंजच्या एक सदस्या आहे. या आधी सुध्दा कल्याणीने साैदर्य स्पर्धेत भाग घेवून अनेक पुरस्कार मिळविले आहे.
सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे यांचे सह मेघा धाेटे, मायाताई काेसरे, प्रभा अगडे, सिमा पाटील, रसिका ढाेणे, कविता चाफले, पुनम काेसरे, पुनम रामटेके, प्रतिभा चट्टे, श्रध्दा हिवरे, प्रतीक्षा झाडे, पायल आमटे, सायली टाेपकर, प्रतीक्षा मैदपवार, स्रूष्टी राेकडे, सारीका खाेब्रागडे, श्रुति कांबळे, तारा आत्राम, लक्ष्मी गायकवाड, सरिता काेटनाके यांनी कु.कल्याणीचे अभिनंदन करत तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
पुरस्कार विजेती कु.कल्याणी सराेदेचे अनेकांनी केले काैतुक व अभिनंदन ! पुरस्कार विजेती कु.कल्याणी सराेदेचे अनेकांनी केले काैतुक व अभिनंदन ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.