सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (१२ सप्टें.) : उमरखेड तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात बंदी भाग म्हणून ओळख असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा आरोग्य केंद्रातील रूग्णवाहीका जुनाट झाल्याने नविन रूग्णवाहीका मिळण्याबाबत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने निवेदनातून शासनाकडे मागणी केली होती. याबाबत विविध माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. सोबतच रुग्णवाहीकेच्या मागणीचा पाठपुरावा निंगणुर जिल्हा परिषद च्या जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे व पंचायत समिती सदस्य विशाखा जाधव यांनी केला. अखेर कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायाकल्प जिल्हा खनिज प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या निधी अंतर्गत नवीन रूग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा मध्ये दाखल झाली आहे.
आज दि.१२ सप्टेंबर रोजी कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते आज कोर्टा येथे मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी या लोकार्पण सोहळा ऊमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने, जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे, पंचायत समिती ऊपसभापती विशाखा ताई शंकर जाधव, विडुळ पंचायत समितीचे सदस्य बालाजी आगलावे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दुबे, डॉ. संतोष सकरगे, डॉ. प्रवीण भुसारे, डॉ. शितल गुट्टे, ताराचंद डोके, बाळू देशमुख, संभा आसनकर, नारायण वाघमारे, वाकडे बाबू, महेंद्र शेळके, परमेश्वर हगवणे वाहन चालक, कोर्टा गावचे सरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेचे लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 12, 2021
Rating:
