सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२३ सप्टें.) : निर्गुडा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. २१ सप्टेंबरला आलेल्या मुसळधार पावसामुळे निर्गुडा नदी ओसंडून वहात होती. नदीने धोक्याची पातळी गाठली होती. नदीचा प्रवाह चांगलाच वाढला होता. या दुथडी भरून वाहणाऱ्या निर्गुडा नदीत पोहण्याची इच्छा जागृत झाली आणी पाण्याचा अंदाज न आल्याने एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. २१ सप्टेंबरला हा युवक नदीवर पोहण्याकरिता गेला, व आज २३ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती त्याच्या लहान भावाने पोलिस स्टेशनला दिली. शहरातील शास्त्री नगर येथे राहणारा फय्याज अली अजगर अली (३८) हा युवक नदीवर पोहण्याकरिता जातो म्हणून घरून निघाला. सायंकाळचे ७ वाजले तरी तो परत न आल्याने त्याच्या भावाने त्याचा शोध घेणे सुरु केले. मोक्षधाम जवळील नदीच्या पुलावर त्याची चप्पल व कपडे आढळून आले. तो नदीच्या प्रवाहात वहात गेला असावा, असा अंदाज त्याच्या लहान भावाला आला. तेंव्हा पासून तो नदीपात्राच्या काठाने त्याचा शोध घेत होता. आज २३ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता रियाज अली अजगर अली हा आपल्या मित्रासह नदी काठाने आपल्या मोठ्या भावाचा शोध घेत असतांना त्याला चव्हाण यांच्या विट भट्ट्याजवळ फय्याज अली याचा मृतदेह आढळून आला. त्याने भावाचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोहण्याचा छंद त्याच्या जीवावर बितला. नदीला पूर आल्यानंतरही त्याने पोहण्याचं धाडस केलं, व स्वतःवर मृत्यू ओढवून घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलिस करित आहे.
पोहण्याचा छंद युवकाच्या जीवावर बीतला, नदीत बुडून त्याचा अकाली मृत्यू झाला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2021
Rating:
