पोषणयुक्त 'फोर्टीफाईड' तांदळा बाबत जनतेचा गैरसमज; प्रहारने जाणून घेतली सत्य परिस्थिती..! ताे तांदुळ खाण्या याेग्यच !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३सप्टें.) : अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहारातून मिळणांऱ्या तांदळात प्लास्टिक युक्त तांदळाची भेसळ होत असल्या बाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र प्रत्यक्षात, केंद्र शासनाकडून वर्ष सन २०२१-२२ (जूलै २०२१ पासून) योजने अंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यांत येणाऱ्या तांदूळाचे फोर्टीफाईड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण १:१०० असून १ किलो मागे १० ग्रॅम या प्रमाणात आहे.
लाभार्थ्यांच्या आहारा मधील सूक्ष्म पोषकत्वांची कमतरता भरुन काढण्याकरीता फोर्टीफाईड तांदूळ देण्यात येत आहे. तांदूळामध्ये Iron, Folic acid and Vitamin B12 तसेच Zinc, Vitamin A, Vitamin B, B2, B5, B6 या पोषक घटकांचा (Micronutrients) समावेश करुन फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने वरील तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. लाभार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करु नये सदरहु तांदूळ प्लॉस्टीक तांदूळ नसून पोषक घटकांचा (Micronutrients) असलेला तांदूळ आहे.
या तांदळाबाबत नागभीड प्रहार कडे जनतेच्या तक्रारी आल्या हाेत्या त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने नुकतीच या मागची खरी कारणे जाणून घेतली असता बाल विकास प्रकल्प अधिकारी, एबाविसेयो, प्रकल्प- नागभीड राजेंद्र ठोंबरे यांनी या बाबत गैरसमज दूर केला व सविस्तर माहिती प्रहार सेवकांना दिली. हे तांदूळ प्लास्टिक चे नसून ते खान्या योग्य आहे. जनतेने याबद्दल गैरसमज न बाळगता लाभार्थ्यांना ते खाऊ घालावे अशी सुचना देखिल त्यांनी प्रहार सेवकांसमाेर केली.
यावेळी प्रहारचे शेखर फटिंग, निलेश डोमळे, विकी फुलवाणी, दीपक माणूसमारे आणि अन्य प्रहार सेवक उपस्थित होते.
पोषणयुक्त 'फोर्टीफाईड' तांदळा बाबत जनतेचा गैरसमज; प्रहारने जाणून घेतली सत्य परिस्थिती..! ताे तांदुळ खाण्या याेग्यच !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2021
Rating:
