राजकुमार ने मिळविलेले यश महागाव तालुक्यासाठी भुषणावह


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२३ सप्टें.) : कबड्डीसारख्या खेळात सुवर्णपदक जिंकुन राजकुमार जाधव याने मिळविलेले नेत्रदिपक यश हे महागाव तालुक्यासाठी भुषणावह असुन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांनी केले.

स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन च्या वतीने हरियाणा मध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये महागाव तालुक्यातील सेवानगर(कासारबेहळ)येथील राजकुमार भिकु जाधव याने महाराष्ट्र संघाकडून खेळुन दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले त्याबद्दल हिवरा(संगम)चे माजी सरपंच प्रविण जामकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आधारस्तंभ श्री साहेबराव पाटील मित्र परिवार,हिवरा पत्रकार संघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब हिवरा यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की कबड्डीमध्ये सेवानगर सारख्या खेडे गावातुन राजकुमार जाधव याने राज्याचे प्रतिनिधित्व करणे व त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणे ही तालुका वासीयांसाठी अभिमानाची बाब असुन त्याला भविष्यात सर्वतोपरीची मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी या कार्यक्रमाला माजी सरपंच डॉ.धोंडिराव बोरूळकर,हिवरा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान फाळके,विविध कार्य.सह.संस्थेचे अध्यक्ष विनायक कदम,प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव पाटील,शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबचे खंडेराव कदम सर, मोक्षधाम सेवा समितीचे अध्यक्ष काशीराम हरणे, कासारबेहळ चे सरपंच शरद राठोड, राजेंद्र कदम,संतोष चव्हाण,शेख सत्तार शेख महंमद उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे राजेंद्र गिरी, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,शाखाध्यक्ष मुकुंद जामकर,मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, शेख फिरोज,रायुकॉ ता सरचिटणीस गजेंद्र जामकर, अविनाश ठाकरे,सचिन बेलखेडे,आधारस्तंभ श्री साहेबराव पाटील मित्र परिवाराचे संजय सोनुने,प्रकाश डांगे,अमोल पाटील, नितीन कदम, सुभाष आंडगे,किरण काळे,अरुण आंडगे यांनी परिश्रम घेतले.
राजकुमार ने मिळविलेले यश महागाव तालुक्यासाठी भुषणावह राजकुमार ने मिळविलेले यश महागाव तालुक्यासाठी भुषणावह Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.