सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०४ सप्टें.) : आगामी काळात येणाऱ्या पोळा,तान्हा पोळा,गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत शहराच्या मुख्य मार्गाने तसेच संवेदनशील भागातून काल रूट मार्च काढण्यात आला.यावेळी मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी तथा प्रमोद मडामे पोलिस निरीक्षक उपस्थित हाेते .
सणासुदीच्या काळात योग्य तो बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने सज्ज राहावे अश्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिल्या.
सदरहु रूट मार्च मध्ये नागभीड पोलीस स्टेशनचे चार पोलीस अधिकारी व विस पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. अचानक शहरात निघालेल्या या रूट मार्च मुळे नागरिकांमध्ये कुठे मोठी घटना घडली की काय असा अंदाज वर्तविला जात होता पण काही वेळातच हा पोलीस विभागाचा रूट मार्च आहे. असे लक्षात आले.