सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
केळापूर, (०४ सप्टें.) : पांढरकवडा पोलिसांनी तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या जानावरांचा ट्रक पकडून कारवाई केली. दि.२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टाटा दहा चक्का कंटेनर क्रं.एच आर ५५ ए एस ८७९५ मध्य गोवंश जातींचे जनावरे अवैध्यरित्या कोंबून कत्तलीकरिता करंजी पांढरकवडा मार्गे हैद्राबादकडे घेऊन जात आहे. या वरून पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे, पो. उप. नि.निलेश गायकवाड, पोना महेश नाईक यांनी रात्री कंटेनर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये लहान मोठे जनावरे अतिशय निर्दयीतेने कोंबल्याचे दिसले. यावरून पोलिसांनी सदर चे गोवंशीय बैल मुक्त करून पाहणी केली असता प्र.१५०००/- एकूण किंमत ८,४०,००० रुपये गिळून आले. या कारवाईत १७ लाखाचा कंटेनर असा ऐकून २५ लाख ४० हजार रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशन ला येऊन नमूद ट्रक चालक व क्लीनर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी गोवंश जनावरांचा भरलेला ट्रक पकडला
Sahyadri chaufer
0