Top News

सुगंधित तंबाखूच्या नावावर मजा हुक्काची सर्रास विक्री, मनसे शिलेदार ठेवणार पाळत

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मरेगाव, (०४ सप्टें.) : तालुक्यातील सुगंधित तंबाखूच्या नावावर मजा, हुक्का ची सर्रास विक्री या पुढे खपवून घेणार नाही प्रसंगी मनसे शिलेदार पाळत ठेवून वठणीवर आणण्यासाठी रंगीत तालीम करेल व सुंगधीत तंबाखू कडवट करेल असा गर्भित इशारा मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या इशारा वजाने व्यापारी वर्गात पुरती खळबळ माजली आहे.

सुगंधीत तंबाखू च्या नावाने शहरात मोठमोठे गोडाऊन भरले असतांना प्रशासन मूग गिळून आहे.लाखो रुपयांची वरकमाई सुरू असताना शहरासह ग्रामीण भागात या गोरख व्यवसायाची मारेगाव व्यापाऱ्यांनी चांगले जाळे विणले आहे.खर्रा तलफ सर्वत्र वाढली असतांना या व्यसनाच्या आहारी कोवळ्या बालकांसह महिलाही मागे नाही त्यामुळे अव्वाच्या सव्वा भावाने सुगंधित तंबाखूच्या नावाने बनावट मजा व हुक्काची सर्रास विक्री मारेगाव येथून सुरू आहे. आरोग्याचा शाप बसलेल्या या व्यवसायाने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तर व्यापाऱ्यांच्या वरकामाईने रग्गड होत असताना हा गोरखधंदा पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी प्रशासनाचे आर्थिक तकलादू धोरण कारणीभूत ठरत आहे.जिल्हा प्रशासना पासून स्थानिक प्रशासनाच्या हातमिळवीनीने तंबाखूजन्य गोरखधंद्याला कायम हिरवी झेंडी दाखविण्यात येत आहे हे मात्र आता कुण्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज उरली नाही.
   
महाराष्ट्र शासनाकडून कायम बंदी असतांना या तंबाखूजन्याला अभय कुणाचे हे कोडे आता उलगडू लागले आहे. मारेगाव तालुक्यात व्यसनाधीनची स्थिती कमालीची चिंताजनक आहे.वेगवेगळ्या शहरातून येणाऱ्या बनावट जाफरणीला व बेतालपणाने शहरा सह ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या गोरखधंद्याला लगाम घालण्यासाठी आता मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे.आपल्या शिलेदारांना घेऊन आता पाळत ठेवली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा "सुगंधित" बनावट जाफरणी प्रकार "कडवट" होणार आहे.

यासाठी प्रसंगी आंदोलन उभारून बेताल व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्याचा एल्गार पुकारणाऱ्या मारेगाव तालुका मनसेंनी बुधवारला थेट जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटीत मारेगाव तालुक्यातील गोरखधंदा चालविणाऱ्या व्यापाऱ्यांची यादीच सादर करण्याची व्युव्हरचना आखली असल्याची माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे व तालुका अध्यक्ष रमेश सोनूले यांनी दिली.मनसेच्या थेट दणक्याने व्यापाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.
Previous Post Next Post